रामदेवबाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण नेपाळमध्ये अवैध कार्यात गुंतलेले नाही-नेपाळ सरकार

काठमांडू-योगगुरू रामदेव बाबांचे सहाय्यक आचार्य बाळकृष्ण नेपाळमधील कोणत्याही अवैध कार्यात गुंतले नसल्याचा स्पष्ट निर्वाळा नेपाळ सरकारने शुक्रवारी दिला. नेपाळच्या गृहमंत्रालयाकडून यासंबंधी असे जाहीर करण्यात आले आहे की बाळकृष्ण हे इनोसंट आहेत व कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात अडकलेले नाहीत. भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्याआधारे ते परदेशी प्रवास करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना नेपाळ सरकारने बाळकृष्ण यांचा जन्म भारतात हरिद्वार येथेच झाला असल्याचे मात्र त्यांचे आईवडील पश्चिम नेपाळमधील सांगिया येथील असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment