अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी निर्दोष – दिग्विजयसिग

पुणे-आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कॉमनवेल्थ गेमप्रकरणात सुरेश कलमाडी हे निर्दोष असल्याचे माझे मत आहे आणि त्यांच्यावर जरी खटला सुरु राहणार असेल तरी त्यांना जामीन मिळणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिग यांनी पुण्यात काँग्रेस मेळाव्यात बोलताना सांगितले.
ते म्हणाले,सर्वांच्या मनातील संशय दूर व्हावा म्हणून जर कलमाडी यांच्यावरील खटला चालू राहणार असेल तर हरकत नाही पण त्यांना आता जामीन मिळण्यास हरकत नाही.दरवर्षीप्रमाणे ते आषाढी एकादशीस पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्रत आले होते आज पहाटेची पूजा आवरून सायंकाळी ते पुण्याला पोहोचले. त्यांनंतर ते काँग्रेस मेळाव्यात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, माहितीच्या अधिकाराचा कायदा आणण्याचे श्रेय पूर्णपणे काँग्रेसलाच जाते कारण त्यामुळेच देशातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात येण्यास प्रारंभ झाला आहे.  टू जी स्पेक्ट्रम प्रकरणे त्यातून पुढे आली. त्याचा जरी काँग्रेसचे मित्र पक्ष अडकण्यात परिणाम झाला तरीही देशाच्या दृष्टीने ती महत्वाची बाब होती.

Leave a Comment