ह्रितिकचा अग्निपथ २०१२ मध्ये येणार

ह्रितिक रोशनचा ‘अग्निपथ’ चा नवीन लूक सर्व ठिकाणी झळकत आहे.करण जोहर निर्मित हा चित्रपट १९९० च्या ‘अग्निपथ’ चा रिमेक आहे.जुना अग्निपथ अमिताभ बच्चन च्या विजय दिनानाथ चौहान या भूमिकेमुळे लोकप्रिय झाला होता.अमिताभला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

नवीन अग्निपथमध्ये ही भूमिका ह्रितिक रोशन साकारणार आहे.त्याचप्रमाणे संजय दत्त देखील महत्वाची भूमिकेत झळकणार आहे.काही तांत्रिक अडचणीमुळे चित्रपट रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा आमचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याने आम्ही चित्रपट पूर्ण करण्यात कोणतीही घाई करणार नसल्याचे वक्तव्य निर्माता करण जोहरने केले आहे.चित्रपट २०१२ मध्ये रेलीज होण्याची शक्यता आहे.जुन्या अग्निपथ प्रमाणे हा रिमेक देखील लोकप्रिय होणार ही अपेक्षा ठेवूया !!

Leave a Comment