मारियाला चित्रपट आणि टीव्ही मालिकेत काम देण्याच्या विरोधात सेना, मनसे, भाजपाचे आंदोलन

मुंबई – नीरज ग्रोव्हर हत्याकांडामधील प्रमुख आरोपी कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज हिला कोणत्याही दूरचित्रवाहिनी कार्यक्रमात तसेच चित्रपटात घेऊ नये, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेना, महाराष्ट* नवनिर्माण सेना आणि भाजपाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. दरम्यान चित्रपट निर्माते रामगोपाल वर्मा यांनी मारियाला आपण कोणत्याही चित्रपटात घेणार नसल्याचा खुलासा केला आहे.
मारियाला चित्रपट किवा दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये घेण्यास खुद्द मनोरंजन क्षेत्रातून विरोध होत आहे. मारियाच्या विरोधात सेना, मनसे तसेच भाजपाच्या युवा मोर्चाने मंगळवारी आंदोलन केले. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साठम यांनी मारियाला चित्रपटात घेतले तर सिनेमागृहात हा सिनेमा चालवू देणार नाही, असा इशारा दिला. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी रामगोपाल वर्मांच्या कार्यालयाबाहेर निदर्शन केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच त्यांना ओशिवरा पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. बिग बॉस मालिका ज्या कलर्स वाहिनीवरुन प्रसारित होते, त्या कलर्स वाहिनीनेदेखील मारिया सुसाईराजला मालिकेत घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मारियाला कोणत्याही परिस्थितीत सिनेमात काम करु देण्यात येणार नाही, असा पवित्रा मनसेच्या सिने वर्कर्स असोसिएशनने घेतला आहे.

Leave a Comment