तलाठी झाले हायटेक

अमरावती – बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा सर्वसामान्य जनतेला किती उत्तम पद्धतीने देता येतो, याचा आदर्श अमरावती जिल्हयातील तलाठ्यांनी घालून दिला आहे. अमरावती जिल्हयातील तलाठी आता खर्या् अर्थाने हायटेक झाले आहेत. कारण, ते तलाठी आता गावागावांत लॅपटॉपच्या सहाय्याने शेतकऱ्यांना सात-बाराचे उतारे देत आहेत. हा प्रयोग राज्यात राबविण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील या तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप विकत घेऊन अधिक गतीने सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ५३१ पैकी पहिल्या टप्प्यात ७५ तलाठ्यांनी लॅपटॉप विकत घेतले. ग्रामीण भागातील शेतकरी वर्षभर तहसील कार्यालयाच्या चकरा मारत असतो. कारण शेतकर्यारला गरज असते ती गावनमुना १, गावनमुना ८, गावनमुना १२ आणि सात-बाराचे उतारे या प्रमाणपत्राची. मात्र, तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे शेतकर्यारला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तलाठी आहे तर तहसीलदार नाही आणि तहसीलदार आहेत, तर तलाठी गायब, ही कायमचीच ओरड. मात्र यावर आता अमरावतीच्या तलाठ्यांनी मात केली आहे. शेतकर्यांसना गावागावातच आवश्यक असलेली प्रमाणपत्रे देण्यासाठी तलाठ्यांनी स्वखर्चाने लॅपटॉप घेतलेत आणि सोबत प्रिटरही विकत घेतले. याकरिता तलाठी मित्र नावाचे एक नवे सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आलेले आहे. तलाठ्याची ही ई-सेवा आता संपूर्ण राज्यभर राबविण्याचाही सरकारी पातळीवर विचार सुरू आहे. राज्य सरकारचे महसूल खात्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नुकतीच अचलपूर येथे भेट देऊन तलाठ्यांच्या लॅपटॉपचा प्रयोग स्वतः बघितला आणि हा प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रतच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी खास सांगितले.

2 thoughts on “तलाठी झाले हायटेक”

  1. क्रुपया मला तला  तलाठी पदासाच्या exam साठी लागणारा  संपूर्ण  syllabus आणि पुस्तकाचे नाव सांगावे ही विनंति

Leave a Comment