मोहाली स्टेडिअमबाहेर क्रिकेट चाहत्यांवर लाठीमार

मोहाली दि.२८ – पीसीए स्टेडियमबाहेर गोंधळ घालणाऱ्या क्रिकेट चाहत्यांवर सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला.आपल्या विविध मागण्यांसाठी सामन्यात व्यत्यय आणण्याची धमकी देणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली.भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्याची तिकिटे मागणारे चाहतेही घटनास्थळी जमल्याने या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.क्रिकेट चाहत्यांनादेखील पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकप क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना होत असून मोहालीतील पीसीए स्टेडियम परिसरात सामान्य नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

Leave a Comment