महापालिकेत १३ एप्रिल रोजी पेन्शन अदालत

मुंबई दि.२८ – पालिका निवृत्तीवेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत,यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता उच्चस्तरीय पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.महानगरपालिकेतील निवृत्ती वेतनधारक त्यांच्या विविध समस्यांसाठी सतत महापालिका आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करतात.त्यांच्या प्रलंबीत प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाचे प्रमुख लेखापाल यांच्याकडे दर महिन्याच्या दुसर्याी मंगळवारी उच्चस्तरीय पेन्शन अदालत सुरु करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकांचे प्रश्न मार्गी लागावेत, हा या पेन्शन अदालतीचा प्रमुख उद्देश आहे. या पेन्शन अदालतमध्ये प्रमुख लेखापाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी, अधिकारी व उपकायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती पेन्शनधारकांची सर्व गार्‍हाणी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करणार आहेत. अधिक माहितीसाठी लेखापाल – कोषागार, प्रमुख लेखापाल कोषागार यांचे कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, जुनी इमारत, पहिला मजला, खोली क्र. ६२, महापालिका मार्ग, फोर्ट मुंबई – ०१ येथे किवा २२६११८७४ वा २२६२०२५१ या क्रमांकावर संफ साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment