मुंबई : लीना नायर, सतीश जामदार यांची निवड

मुंबई २४ मार्च – महाराष्ट्र राज्य परिषदेच्या अध्यक्षपदी हिंदुस्थान युनिलिव्हरच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना नायर यांची तर उपाध्यक्षपदी ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक सतीश जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिलत नाय यांच्याजागी नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नायर गेली १७ वर्षे युनिलिव्हरमध्ये कार्यरत असून त्यांनी विविध जबाबदारीची पदे भूषविली आहेत.मुंबई आयआयटीमधून मेकॅनिकलची पदवी घेतलेले जामदार हे निर्मिती विभागाचे उपाध्यक्ष म्हणून १९९६ मध्ये ब्लू स्टारमध्ये रुजू झाले. त्यांना उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान प्रकल्प, मटेरियल मॅनेजमेंट आदी विविध क्षेत्रांतील ३५ वर्षांचा अनुभव आहे.

Leave a Comment