मुंबई : गुंतवणुकीचा ओघ वाढण्याचा अंदाज

मुंबई २४ मार्च – जागतिक आर्थिक सुधारणेचा वेग मंद असूनही भारतात मात्र दीर्घ काळासाठी गुंतवणुकीचा ओघ वाढतच राहील,असा अंदाज एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तसेवा पुरवठादार कंपनीने व्यक्त केला आहे.येत्या काही महिन्यांमध्ये देशात फारशी गुंतवणूक झाल्याचे दिसून येणार नाही तथापि भविष्यात मात्र गुंतवणुकीचे भवितव्य चांगले आहे,असे एम्के ग्लोबलचे एम.डी.कृष्णकुमार कारवा यांनी सांगितले.गुंतवणूकदारांच्या दोन दिवसांच्या परिषदेत ते बोलत होते.

भारतात गुंतवणूक करण्यासाठी सध्या वेळ योग्य आहे. गुंतवणुकदारांनी जर समभागांत गुंतवणूक केली तर भारतासारख्या उगवत्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्याची मोठी संधी त्यांना मिळू शकेल. या परिषदेत सहभागी झालेल्या १५ भारतीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी १८० बैठका घेऊन भारतातील संभाव्य गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले.

Leave a Comment