सोलापूर : श्रीविठ्ठल, श्रीसंत दामाजी, सहकार शिरोमणी व भीमा कारखान्यांसाठी शरद पवारांची मदत घेणार – आ. भालके

पंढरपूर २१ मार्च – यापुढील काळात श्रीविठ्ठल, श्रीसंत दामाजी, सहकार शिरोमणी व भीमा सहकारी साखर कारखाने केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.ऊस उत्पादक शेतकर्यां च्या हिताचेच निर्णय आगामी काळात घेतले जातील,अशी  ग्वाही आ.भारत भालके यांनी दिली.श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्यात चालू गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ९ लाख ९ हजार ९९९ व्या साखर पोत्याचे पूजन आ.भारत भालके, भीमा कारखान्याचे संचालक धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भीमा कारखाना निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांच्या सत्कार समारंभप्रसंगी आ. भारत भालके बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. निवृत्ती महाराज हांडे होते. कार्यक्रमास सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, दामाजी कारखान्याचे चेअरमन अॅड. नंदकुमार पवार, पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने, श्रीविठ्ठल कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणआबा पवार, संचालक राजूबापू पाटील, युवराज पाटील, काँग्रेसच्या नलिनी चंदेले, सुनिता गायकवाड उपस्थित होते. श्रीविठ्ठल कारखान्याने चालू गळीत हंगामात ८ लाख ७० हजार मे. टन उसाचे गाळप करून ९ लाख, ९ हजार ९९९ साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. राज्यात दुसर्याउ नंबरचा उतारा मिळाला आहे, असे सांगून आ. भारत भालके म्हणाले, यंदा उसाचे उत्पादन जास्त झाले असून कारखान्यासमोर ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्रीविठ्ठल, सहकार शिरोमणी, श्रीसंत दामाजी व भीमा कारखाना मिळून ऊसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीविठ्ठल कारखाना १५ लाख मे. टन ऊस गाळप करणार असून कारखाना मे अखेरपर्यंत चालणार आहे. भीमा व दामाजी कारखान्यांसाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची मदत घेवून उपपदार्थांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये डिस्टलरी व सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या परिवर्तनाची लाट असल्यामुळे परिवर्तन घडले.

भीमा कारखान्याचे संचालक धनंजय महाडिक म्हणाले की, भीमा कारखान्यातील २५ वर्षांच्या कारकीर्दीस शेतकरी सभासद कंटाळल्यामुळे त्यांनी परिवर्तन घडवून नवीन चेहर्यां ना काम करण्याची संधी दिली आहे. यापुढील काळात सभासदांना विश्वासात घेवून काम करण्यात येईल. श्रीविठ्ठल परिवारातील नेते एकत्र आल्यामुळे परिवर्तनाची लाट येवू लागली आहे असे सांगून चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, शेतकर्यां नी आता खंबीरपणे श्रीविठ्ठल परिवाराच्या मागे उभे रहावे. शेतकर्यां नी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवावे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना ह. भ. प. हांडे महाराज म्हणाले की, श्रीविठ्ठल परिवारातील नेते एकत्र आले आहेत, त्यामुळे परिवर्तन घडत आहे. नेत्यांनी एकविचाराने काम करावे. शेतकर्यां च्या विकासासाठी योजना राबवाव्यात. या कार्यक्रमास अनेक ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment