अमरावती : लोकपाल विधेयकासाठी आता निर्णायक लढा – अण्णा हजारे

५ एप्रिलपासून उपोषण-अमरावती १७ मार्च – लोकपाल विधेयकात गैरव्यवहारासाठी शिक्षेच्या तरतुदी कडक असाव्यात,या मागणीसाठी येत्या ५ एप्रिलपासून आपण दिल्ली येथे उपषण सुरू करणार असून लोकपाल विधेयकाच्या संदर्भात आता निर्णायक लोकलढा उभारला जाणार आहे.सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास १२ किवा १३ एप्रिल रोजी देशभर ‘जेलभरो’ आंदोलन केले जाईल. अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

सुधारित लोकपाल विधेयक सादर केले जावे, यासाठी केंद्र सरकारवर लकांचा दबाव आणावा लागेल, ही निर्णायक लढाई असणार आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ज्यांचे नियंत्रण आहे, त्यांच्यावर जनमताचा रेटा वाढवावा लागणार आहे. आपल्या मागण्यांसाठी येत्या ५ एप्रिलपासून दिल्ली येथे उपोषण सुरू करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले की, उपोषणाला योगगुरु बाबा रामदेव यांच्या भारत स्वाभिमान आंदोलनाचा तसेच श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांचा पाठिबा असून देशभरातील १ हजार कार्यकर्ते उपोषणात सहभागी होणार आहे. यात महाराष्ट्रातील ३०० कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे. सरकारने उपोषणाची दखल घेतली नाही तर १२ किवा १३ एप्रिल रोजी देशभरात जेलभरो आंदोलन केले जाईल, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

2 thoughts on “अमरावती : लोकपाल विधेयकासाठी आता निर्णायक लढा – अण्णा हजारे”

Leave a Comment