औरंगाबाद : तोतया पोलिस बनून मंगळसूत्र पळविले

औरंगाबाद १६ मार्च –  तोतया पोलिस बनून पायी जाणार्यात महिलांना समोर खून झाला आहे,अशी बतावणी करुन त्यांच्या अंगावरचे दागिने आपल्याकडे घेवून पोबारा केल्याची घटना गर्दी आणि वर्दळीच्या रस्त्यावर घडली आहे. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून तोतया पोलिसांनी थेट पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. मंगळवारी सकाळी औरंगाबादमधील जालना रोडवर अमरप्रीत हॉटेल चौकाजवळ पायी जाणाऱ्या महिलेला दोन जणांनी थांबविले. आम्ही पोलिस आहोत,समोर खून झाला आहे असे सांगून महिलांना घाबरविण्यात आले. सर्व दागिने काढून पिशवीत ठेवा,आमचे साहेब तपासणी करणार आहेत असे दोघांनी या महिलेला सांगितले.

त्यानुसार वसुमती रामगोपाल खंडेलवार यांनी दागिने काढले. तेवढ्यात तिसरा तेथे आला आणि त्याने आम्ही पोलिस आहोत लवकर दागिने पिशवीत घाला, असे म्हणत त्या महिलेच्या हातातून दागिने घेतले व पिशवीत घालण्याचे नाटक करत दागिने लांबविले. रिकामी पिशवी त्यांच्या हातात देवून पोबारा केला. खुनाची अफवा उठवीत अशा प्रकारे या तिघांनी शहरात ठिकठिकाणी महिलांचे दागिने लांबविल्याच्या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत

Leave a Comment