मुंबई : महिलांना ५० टक्के आरक्षण हा स्त्री शक्तीचा सन्मान – खा. संजय पाटील

मुंबई १५ मार्च – राज्याचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी महिलांना सर्वप्रथम आरक्षण दिले. त्या संधीचे महिलांनी सोने केले. जागतिक महिला दिनाची शताब्दी साजरी करीत असताना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण हा ‘‘स्त्री शक्तीचा‘‘ सन्मान आहे, असे उद्गार खा. संजय दीना पाटील यांनी भांडूप येथे राष्ट*वादी काँग्रेसच्या सभेत काढले.

ईशान्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिना पाटील इस्टेट, भांडूप पश्चिम येथे प्रमुख पदाधिकार्यां ची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खा. पाटील बोलत होते. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जातीयवादी पक्षांना बाहेर ठेवावे असे पक्षाच्या अनेक पदाधिकार्यां नी यावेळी सांगितले. सभेस ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष विलास माने, जिल्हा निरीक्षक अरविद तिवारी, पल्लवी संजय पाटील, माजी नगरसेविका मनोरमा पाटील, भारतीताई जाधव, भास्कर विचारे, एल. बी. सिग, जयप्रकाश खरात, डॉ. मुमताज, नगरसेवक हरूण खान, नगरसेविका राखी जाधव-सालियन, माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, नंदू वैती, माजी नगरसेवक सुरेश पाटील, नामदेव उबाळे, शालिनीताई गायकवाड, सोहेल सुभेदार, मुबारक खान, नगरसेविका चारु शर्मा, चंदन शर्मा, खिमजीभाई सतरा, आसिफ सिद्धिकी, फारुखभाई, साहिदभाई आदी उपस्थित होते.

Leave a Comment