करचुकवेगिरी प्रकरणी घोडे व्यापारी हसन अली खान याला जमीन मंजूर

मुंबई दि ११ करचुकवेगिरी प्रकरणी अटक करण्यात आलेला घोडे व्यापारी हसन अली खान याला मुंबई न्यायालयाने ७५ हजार रूपयांचा जामीन मंजूर केला आहे.जामीनावर त्याची सुटका करताना न्यायाधीशांनी हसन अली खान विरोधात इनफोर्समेंट डायरेक्टर तर्फे सादर करण्यात आलेल्या ७०० पानी कागदपत्रांत त्याच्याविरूद्ध भक्कम पुरावा नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

आयकर अधिकार्यांतनी हसन अलीच्या घरांवर २००७ साली टाकलेल्या छाप्यात कागदपत्रे आणि लॅपटॉप जप्त केला होता. या कागदपत्रांनुसार त्यांनी हसन अलीने झुरीचच्या बँकेत ८ बिलीयन डॉलर्सची रक्कम ठेवली असल्याचे नमूद केले आहे मात्र ही रक्कम हसन ने कुठून आणली याचा १०० टक्के पुरावा आयकर विभाग देऊ शकलेला नाही. इनफोसमेंट डायरेक्टरेटनेही पुनः तपासाबाबत काळजी घेतलेली नाही व त्याला आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच अटक केली असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. २००७ साली ही कागदपत्रे मिळूनही त्याला बनावट पासपोर्ट प्रकरणी त्याला२००८ मध्ये अटक झाली व जानेवारी २००९ला त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.

करचुकवेगिरीबद्दल त्याला पुन्हा सोमवारी अटक करण्यात आली होती व त्याकेसमध्ये आज न्यायालयाने त्याची जामीनावर मुक्तता केली आहे.

Leave a Comment