कार्लोस स्लीम सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

अमेरिकेतील फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी आज जाहीर केली असून त्यानुसार सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान यावेळी मेक्सिकोच्या कार्लोस स्लीम यांनी पटकावला आहे. या यादीतील पहिल्या १०० जणांत भारतीय वंशाच्या दोघा उद्योगपतींसह अन्य पाच जणांचाही समावेश आहे. या यादीनुसार भारतीय वंशाचे लक्ष्मी मित्तल सहाव्या क्रमांकावर असून रिलायन्सचे मुकेश अंबानी ९ व्या स्थानावर आहेत. विप्रोचे अझीझ प्रेमजी ३६ व्या, शाही व रवी रूईया ४२ व्या, सावित्री जिदाल ५६ व्या, गौतम अडाणी ८७ व्या तर कुमार बिर्ला ९७ व्या स्थानावर आहेत.

कार्लोस स्लीम यांची संपत्ती ७४ अब्ज डॉलर्स इतकी असून त्यांच्यापाठोपाठ दुसर्या  स्थानावर बिल गेटस आहेत. वॉरेन बफे यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षीच्या १०११ अब्जाधीशांत यंदा वाढ झाली असून ही संख्या या वर्षी १२१० अब्जाधीशांवर गेली आहे. मेक्सिकोत जगातील सर्वाधिक अब्जाधीश असून चीनमधील अब्जाधीशंांच्या संख्येतही गतवर्षीपेक्षा १० ने वाढ झाली आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

फोर्ब्सने जगातील सर्वाधिक शक्तिशाली  व्यक्तींची जी यादी जाहीर केली आहे त्यात चीनच्या राष्ट्राध्यक्ष हु जितांव यांनी गतवर्षी प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष बराक ओबामा यांनादुसऱ्या  नंबरवर ढकलून पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. पॉवरफुल व्यक्तींच्या या यादीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नववे तर पंतप्रथान मनमोहनसिंग यांनी १८ वे स्थान मिळविले आहे. मुकेश अंबानी आणि लक्ष्मी मित्तल यांनी अनुक्रमे ३४ व ४४ वे स्थान पटकावले आहे.

फोर्ब्सचे चीनचे राष्ट्राध्यक्ष हुजितांव यांना नदी प्रवाह वळविणे, नवीन शहरे विकसित करणे, बंडखोरांना तुरूंगात डांबणे, इंटरनेट सेन्सॉरशीप लागू करणे याचे श्रेय दिले असून यामुळेच ते पाश्चिमात्य राष्ट्राध्यक्क्षांपेक्षा वेगळे ठरलेअसल्याचे नमूद केले आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख १.२ अब्ज भारतीयांवर प्रभाव असलेली व्यत्त*ी असा करण्यात आला असून नेहरू गांधी घराण्याच्या सच्च्या वारसदार म्हणून त्यांना संबोधण्यात आले आहे. भारताच्या समाजवादी अर्थव्यवस्थेला जगातील वेगाने वाढणार्याध अर्थव्यवस्थेचे स्वरूप प्राप्त करून दिल्याचे श्रेय पंतप्रधान मनमोहनसिग यांना देण्यात आले आहे. या श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या  क्रमांकावर सौदचे राजे अब्दुल्ला यांचे नांव आहे.

जगावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या  व्यक्तींच्या या यादीत अमेरिकेच्या नाकी दम आणणार्याव ओसामा बिन लादेन याचा ५७ वा क्रमांक असून डॉन दाऊद इब्राहिम याला ६३ वे स्थान देण्यात आले आहे.

Leave a Comment