पुणे दि. ८ – पुण्याजवळील चाकण येथे आज (दि.७ सोमवार) सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. चाकण येथे राहणार्या शरद राक्षे यांच्या घरात हा स्फोट झाला असून त्यात घरातील सहा जण तर घराजवळच राहणार्या अन्य तीन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. या सर्वांना पुण्याच्या ससून व पिपरीच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गैस सिलेंडरचा स्फोट होऊन ९ जखमी
या स्फोटामुळे राक्षे यांच्या घराच्या सर्व भिती पडल्या व दरवाजा सुमारे पन्नास फूट उंच उडाला असल्याचे पोलिसांकडून समजते.
