औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा

यवतमाळ, २१ फेब्रुवारी – औदुंबराच्या (उंबर) झाडाच्या फुलाचे आणि पानाचे सेवन केल्याने दारू सुटत असल्याने विदर्भातील हजारो पीडित उपचारासाठी माहूर (जि. नांदेड) तालुक्यातील गोंडवडसा येथे जात आहेत. काहीजण या प्रकाराला अंधश्रद्धा किवा बुवाबाजीचा प्रकार म्हणतात. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी व्यसनमुक्तीबरोबरच अनेक दुर्धर आजारही बरे होत असल्याचा दावा उपचार घेणारे करीत आहेत. त्यामुळे येथे हजारो व्याधीच्या रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी होत आहे. येथे येणार्या  नागरिकांना औषध विनामूल्य देण्यात येत असून त्यांचा आशीर्वाद आपणास मिळत आहे, अशी प्रतिक्रिया वैद्य शे. जमीन लतीफ यांनी व्यक्त केली.

उमरखेडपासून ८० किलोमीटर अंतरावर मराठवाड्यातील माहूर तालुक्यात गोंडवडसा गाव आहे. येथील सधन शेतकरी शेख जमीन शेख लतीफ यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण झाल्यानंतर ते शेती व्यवसायाकडे वळले. साधारणतः सहा महिन्यापूर्वी एके दिवशी शेतात काम करीत असताना शेख शेताच्या विहिरीजवळील उंबराच्या झाडाखाली झोपले होते. त्यांना अकस्मात औदुंबर वृक्षातील औषधी गुणधर्माबाबत साक्षात्कार झाला, असा त्यांचा दावा आहे. तेव्हापासून ते या झाडाची पाने व फळांच्या साहाय्याने औषधोपचार करू लागले. बऱ्याच  गावकऱ्यांना , बऱ्याच जणांना चांगला अनुभव आला. हळूहळू ही माहिती पसरत गेली.

1 thought on “औदुंबराचे पान खा आणि दारू सोडवा”

Leave a Comment