ह्रितिक देतोय मुलांना स्नोबोर्डींगचे धडे

ह्रितिक रोशनने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्या कुटुंबाबरोबर दुबईला केली.ह्रितिक रोशन आपल्या कुटुंबासोबत दुबई इथे सुटीसाठी आला आहे.रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढून आपल्या मुलांना,पाच वर्षीय ह्रेहान आणि ३ वर्षाचा ह्रीदान, स्नोबोर्डींग दुबईला शिकवत आहे.

आपल्या मुलांची खूप काळापासून हा खेळ शिकण्याची इच्छा होती परंतु शुटींगमध्ये गुंतल्याने आधी अशी संधी मिळाली नाही, असे ह्रितिकने सांगितले.रोशन कुटुंबीय खास नववर्षाच्या निमित्त्याने दुबईत सुटी व्यतीत करत आहेत.

“आयुष्याच्या संकटाचा सामना करण्याची शक्ती बालपणी नवीन खेळ शिकतानाच मिळते.माझी मुंल स्नोबोर्डींग करतांना घाबरतील,पडतील पण त्यातूनच ते पुढे स्वतः उठायला शिकणार” असे ह्रितिकचे म्हणणे आहे.

-सौजन्य व्रृतसंस्था.