कतरिना कैफ २०११ साठी तयार

‘तीस मार खान’ मधील नगण्य भूमिकेनंतर कतरिना कैफ २०११ मात्र दमदार भूनिका असलेलेच चित्रपट स्वीकारणार आहे.कतरिना प्रकाश झा यांचा ‘ सत्संग ‘ हा चित्रपट त्याच पठडीतला…राजनीती चित्रपटाप्रमाणे यात देखील कतरिना साध्या वेशभूषेत आणि कमी मेकअप मध्ये दिसणार.राजनीती मधील भूमिका ही माझ्या चित्रपट प्रवासातील सगळ्यात कठीण भूमिका होती असे कतरीनाचे म्हणणे आहे.

कतरिना इम्रान खान सोबत ‘मेरे ब्रदर कि दुल्हन ‘ या चित्रपटाची शुटींग करते आहे.त्याचप्रमाणे २०११ तिचा ह्रितिक रोशन,फरहान अख्तर आणि अभय देओल यांची भूमिका असलेला ‘झिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

राजकुमार संतोषीच्या आगामी प्रेमकथा असलेल्या चित्रपटात कतरिना अभिषेक बच्चन बरोबर दिसणार.अभिषेक बरोबर आधी ‘सरकार’ मध्ये काम केले होते.तो चित्रपट गंभीर विषयावर होता.पण आता प्रेमकथेत अभिषेकसोबत काम करतांना मजा येणार असे कतरिना म्हणते.

कतरीनाला २०११ असेच यशस्वी जावे या शुभेच्छा !!

1 thought on “कतरिना कैफ २०११ साठी तयार”

Leave a Comment