मावळातील गोळीबाराची सीबीआय चौकशी करा – गोपीनाथ मुंडे

पुणे,दि.१२- मावळातील आंदोलकांवरील गोळीबाराची सीबीआय चौकशी होणे आवश्यक असून माणुसकी नसलेले हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी आपण राज्यपालांकडे केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले.
मुंडे यांनी आज मावळात भेट देऊन गोळीबारातील मृतांचे सांत्वन केले. तळेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आंदोलकांचीही त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.पवनेच्या पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात हिसा घडविण्याचा कट असल्याचे पोलीस आता सांगत आहेत. मग हा कट उघडकीला का आले नाही असा सवाल करून मुंडे म्हणाले की मुंबईत बॉम्बस्फोट घडले त्याचा सुगावाही आर.आर.पाटील यांच्या गृह विभागाला लागला नाही. हे सरकार आणि पोलिसांचे ’इंटेलिजन्स फेल्युअर’ आहे.
या गृह विभागाने एका महिन्यात चार वेळा शेतकरी वारकयांवर गोळीबार केले. या सरकारला माणुसकी नाही. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबिय आणि जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री पाटील यांना वेळ नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी सुरू आहे असा आरोप करून मुंडे म्हणाले की केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीच नव्हे तर सगळे सरकारंच बरखास्त करावे अशी आपली मागणी आहे.
मावळातील शेतकयांचा पवनेचे पाणी जलवाहिनीतून पिपरी चिचवड महापालिकेला देण्यास असलेला विरोध योग्यच आहे. प्रकल्पग्रस्त शेतकयांना जमिनी मिळाल्या नाहीत. ज्यांच्याजवळ जमिनी आहेत त्यांना पाणी नाही. शासनाचा त्यांच्यबद्दलचा दृष्टिकोन असंवेदनशील आहे. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपले असले तरीही या शेतकयांना न्याय देण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवू असेही मुंडे यांनी सांगितले.      
 

Leave a Comment