प्रतिष्ठेच्या बर्मिंगहॅम विद्यापीठ कुलगुरूपदी बिलमोरिया

kiran
ब्रिटनमधील प्रतिष्ठेच्या बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या कुलगुरूपदी भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योजक किरण बिलमोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोब्रा बिअर उद्योगसमुहाचे संस्थापक असलेले बिलमोरिया जुलैपासून हा कार्यभार सांभाळणार आहेत. ते या विद्यापीठाचे सातवे कुलगुरू असतील.

बिलमोरिया यांनी या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यापीठाचे कुलगुरत्व सांभाळणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी याच विद्यापीठात शिक्षण घेतले आहे असेही ते म्हणाले. विद्यापीठातील प्रो. डेव्हिड इस्टवूड यांनी बिलमोरिया यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी होणार असल्याचे सांगितले.

बिलमोरिया यांचा जन्म हैद्राबाद येथील असून ते युके इंडिया बिझिनेस कौन्सिल संस्थेचे सदस्य आहेत.२००४ सालापासून त्यांनी ब्रिटन सरकारच्या शिक्षण विभागात विविध पदांवर काम केले आहे.