
ब्रिटीश स्पोर्टस कार कंपनी ट्रायडेंटने जगातील सर्वाधिक वेगवान आणि इंधन बचत करणारी ट्रायडेंट आयसेनी कार बाजारात आणली आहे. डिझेलवर चालणारी ही कार १ लिटरमध्ये २४.३९ किमी जाते असा कंपनीचा दावा असून गाडीची किमत आहे ९६ हजार पौंड. म्हणजे ९७.५ लाख रूपये.
ट्रायडेंट आयसेनी- इंधन बचत करणारी स्पोर्टसकार
कंपनीने असेही जाहीर केले आहे की गाडीची टाकी एकदा फुल केली की ती २ हजार मैल म्हणजे ३२१८ किमीचे अंतर धावू शकते. या गाडीसाठी कंपनीने टॉर्क मॅनिप्युलेशन तंज्ञत्रानाचा वापर केला आहे. गेली अनेक वर्षे या गाडीसाठी संशोधन केले जात होते. ही कार मिनरल डिझेल , बायो डिझेल वर चालणार असून ती सध्या तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. ही लिमीटेड प्रॉडक्शन कार आहे आणि आत्ताच तिची प्रतीक्षायादी मोठी आहे असेही कंपनीने जाहीर केले आहे.
आयसेनी, आयसेनी मॅग्ना आणि आयसेनी व्हेंचरर अशी तीन मॉडेल कंपनी उत्पादित करणार आहे.
