घरच्या घरी ओळखा पाण्याची गुणवत्ता

purewater
पाण्यातील प्रदूषण आणि त्यामुळे होणारे अनेक संसर्गजन्य रोग यांचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील सरकारे सतत प्रयत्न करत आहेत. आपल्याला मिळालेले पाणी खरोखरच चांगले आहे की नाही हा प्रश्न सर्वसामन्यांनाही सतत भेडसावत असतो. त्यावर आता संशोधकांनी उपाय शोधला असून घरच्या घरी पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एक गोळी तयार केली आहे.

कॅनडातील मॅक्मास्टर विद्यापीठातील बायोइंटरफेसेज इंन्सिस्टूटमधील संशोधक जॉन केनन यांनी ही गोळी तयार केली आहे. पाण्याचा ग्लास भरून घेतल्यानंतर ही गोळी त्या पाण्यात टाकून हलवायचे. पाण्याचा रंग बदलला तर पाणी शुद्ध नाही असे समजायचे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते हे रसायनशास्त्रच आहे आता ते गोळी स्वरूपात उपलब्ध करता येणार आहे. हा शोध रसायनविज्ञान पत्रिका एंजेवाट केमी मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे लोकांना प्रयोगशाळेकडे धाव न घेता घरच्या घरीच पाण्याची तपासणी करता येणार आहे.