
तंत्रज्ञानाच्या विकासातील पुढचे पाऊल आता पडले असून इलेक्ट्रीक कार पाठोपाठ आता वीजेवर चालणारे विमान एअरबस कंपनी बाजारात आणणार आहे. फ्रांसच्या या कंपनीने वीजेवर चालणारे जेट प्रवासी विमान तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले असून प्रायोगित तत्वावर तयार करण्यात आलेल्या या प्रकारच्या दोन सीटर विमानाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचे समजते.
एअरबस आणणार वीजेवर चालणारे विमान
हे प्रवासी विमान छोट्या आकाराचे म्हणजे एकावेळी ७० ते ८० प्रवासी बसू शकतील असे असेल. हे विमान हायब्रीड इलेक्ट्रीक इंजिनावर चालेल. एअरबस समुहाचे प्रमुख अधिकारी जीन बोटिट म्हणाले की हे विमान प्रत्यक्ष वापरात येण्यास दहा वर्षे लागतील. मात्र त्याच्या निर्मितीची सुरवात झाली आहे. या प्रकारच्या मॅरी नॅक या टू सीटर विमानाने १७७ किमी प्रतितासाचा टप्पा गाठला असून ते दीड तास हवेत उडू शकले आहे. याच धर्तीवर मोठी विमानेही आता वीजेच्या सहाय्याने उडविण्यात येतील. यामुळे इंधन टंचाईवर तोडगा निघू शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
