भविेष्यातील मोबाईल टी शर्टवर होईल प्रिंट

mobile
मेलबर्न – भविष्यातील मोबाईल अगदी छोटा तरीही प्रभावशाली आणि लवचिक बनविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या संशोधनात संशोधकांना चांगले यश मिळाले आहे. हा मोबाईल टी शर्टवर प्रिंट ही होऊ शकेल असा संशोधकांचा दावा आहे.ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधक रूपसिघे यांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी स्पैसर (सरफेस प्लाझमॉन अॅम्प्लीफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन) हे मॉडेल तयार केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये नॅनोस्केल लेजर असून त्यामुळे इलेक्ट्रोनी माध्यमातून प्रकाशकिरणे सोडली जातात. हे मॉडेल कार्बनचा वापर करून तयार केल्याने त्याचे अनेक फायदे आहेत असा त्यांचा दावा आहे.

आत्तापर्यंत वापरात असलेल्या मॉडेलमध्ये सोने चांदीच्या नॅनो पार्टिकलचा वापर केला जात आहे. मात्र कार्बनच्या वापरामुळे जादा लवचिवता मिळते आहे तसेच अति उच्च तापमानातची ते काम करू शकते. शिवाय हे मॉडेल पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे आकाराने छोटे, अतिशय पातळ, लवचिक मोबाईल तयार करता येतील शिवाय ते युजरच्या कपड्यांवर प्रिंट ही करता येणार आहेत. हे संशोधन एसीसी नॅनो गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात येत आहे.