
नवी दिल्ली – अर्थव्यवस्था आणि राजकीय क्षेत्रातील अस्थिरतेनंतरही भारत जगातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात आशावादी देश बनला आहे. मार्केट रिसर्चर `नील्सन’कडून इका नवीन स्तरावरील अभ्यासक्रमात असे निष्पन्न झाले आहे. भारताच्या कंझ्युमर्स कॉन्फिडन्स लेवल चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत 6 अंकांनी वधारून 121 अंकांवर पोहचला आहे. 124 अंकांबरोबर जगात आशावादी देशात अग्रस्थानी इंडोनेशिया असून 116 अंकांसोबत फिलिफाईन्स तिसऱया क्रमांकावर आहे.
या अभ्यासानुसार, सर्वेक्षणात भारताच्या शहरातील लोकांपैकी 68 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, देश आर्थिक मंदीतून जात आहे. यापैकी 54 टक्के लोकांना देश पुढील 12 महिन्यांमध्ये मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणार असे वाटते.
जगातील दुसरा सर्वात आशावादी देश भारत
नील्सन इंडियाचे अध्यक्ष पीयुष माथूर यांनी म्हटले आहे की, कंझ्युमरनी नकारात्मक आर्थिक स्थितींमध्ये ताळमेळ बसविला असून महागाईतही चांगल्या प्रदर्शनाची आशा बाळगली आहे. त्यांना खात्री आहे की, भारताच्या गुंतवणूक क्षेत्रात प्रगती होणार आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील तीन चतुर्थांश म्हणजे 74 टक्के लोक पुढील 12 महिन्यांमध्ये रोजगाराच्या दृष्टीने आशावादी आहेत. याची टक्केवारीही मागच्या तिमाहीत 4 टक्क्यांनी वाढली आहे.
जानेवारी-मार्च 2014 च्या तिमाहीतील उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार, काही प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एचयूएल, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस् आणि मॅरिको समवेत जास्त कंपन्यांनी कमकुवत निकाल दर्शविले आहेत. हॉर्लिक्स मिल्क ड्रिंक निर्माता कंपनी ग्लॅक्सोस्मिथक्लाईन कंझ्युमर हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक झुबेर अहमद यांनी सांगितले की, कंझ्युमरचा विश्वास मुख्य म्हणजे याच कारणामुळे वाढला आहे. निवडणूकीच्या निकालानंतर एक मजबूत सयकार निर्माण होऊन देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेईल.
ऑनलाईन पध्दतीद्वारे उत्तर देणाऱया लोकांपैकी 54 टक्के लोकांनी सध्याचा काळ खरेदी करण्यास योग्य असल्याचे म्हटले आहे. देशात युवावर्ग जास्त प्रमाणात आहे. मुख्य म्हणजे युवा वर्ग टेक्नॉलॉजी क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. तर 32 टक्के युवक वर्ग रिटायरमेंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
