मुस्लीम ब्रदरहुडच्या ६८३ जणांना मृत्यूदंड

egypt
इजिप्त- पोलिस ठाण्यांवर हल्ला करणे, पोलिसांना ठार मारणे आणि अन्य ठिकाणी हिंसा करून १०० हून अधिक निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इजिप्तमधील न्यायालयाने मुस्लीम ब्रदरहूडच्या नेत्यासह ६८३ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा ऐकताच न्यायालयाबाहेर जमलेल्या आरोपींच्या नातेवाईक स्त्रिया बेशुद्ध पडल्याचेही सांगितले जात आहे. इतकया प्रचंड प्रमाणावर मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याबद्दल संयुकत राष्ट मानवाधिकार समितीने इजिप्त सरकारचा निषेध केला आहे.

इजिप्त तसेच रशिया, सिरीया, सौदी अरेबिया आणि यूएई मध्ये मुस्लीम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले गेले आहे. हे सर्व माजी राष्ट्रपती मोहम्मद मुर्शी यांचे समर्थक आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये या समर्थकांनी मोर्शी यांच्या समर्थनार्थ पोलिस ठाण्यांवर हल्ले चढविले होते आणि पोलिसांना ठार केले होते. या हिसाचारात १०० हून अधिक निरपराध नागरिकांचाही बळी गेला होता. यावेळी झालेल्या अटक सत्रात १२०० हून अधिक मुस्लीम ब्रदरहूड सदस्यांना अटक करून तुरुंगात टाकले गेले असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले गेले आहेत असेही समजते.