Traffic Challan : कारमध्ये सिगारेट ओढणाऱ्यांची आता खैर नाही, त्याच्याकडून वसूल केला जाऊ शकतो एवढा दंड


वेगात चालणे, सीट बेल्ट न लावणे, दारू पिऊन गाडी चालवणे, या सर्वांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत अर्थिक दंड वसूल केला जाऊ शकतो. पण गाडी चालवताना सिगारेट ओढल्यास दंड वसूल केला जातो की नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का? वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.

प्रत्येक कार चालकाने वाहन चालवताना वाहतुकीच्या सर्व नियमांची जाणीव ठेवली पाहिजे, परंतु तरीही असे 90 टक्के लोक असतील, ज्यांना कारमध्ये धुम्रपान केल्यामुळही आर्थिक दंड वसूल केला जाऊ शकतो.

कारमध्ये सिगारेट ओढल्याबद्दल, तुम्हाला DMVR 86.1(5)/177 MVA अंतर्गत प्रथम 500 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. जर तुम्ही ही चूक पुन्हा केली तर पुढच्या वेळी तुम्हाला 1500 रुपयांचे चलान भरावे लागेल. जर तुम्हाला ट्रॅफिक चलान मिळू नये असे वाटत असेल, तर तुम्ही गाडी चालवताना किंवा गाडी थांबवल्यानंतरही गाडीमध्ये धुम्रपान टाळावे. तुम्ही ही चूक पुन्हा करत राहिल्यास तुमचे चलान वाढतच जाईल.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त सीएनजी वाहन चालकांनीच काळजी घेण्याची गरज का आहे? कारण समजा गॅस गळती झाली आणि तुम्ही कारमध्ये बसून धूम्रपान करत असाल, तर कारचा स्फोट होऊ शकतो. अशा स्थितीत तुमच्या खिशापेक्षा तुमच्या जीवाला जास्त धोका असू शकतो.

कारमध्ये धुम्रपान करण्यास अनेक देशांमध्ये पूर्णपणे बंदी आहे. सिगारेटचा धूर अनेक हानिकारक रसायनांनी भरलेला असतो, जो कारमधील इतर प्रवाशांसाठी देखील हानिकारक असू शकतो. फक्त सिगारेटच नाही, तर गाडीत दारू प्यायल्यासही आर्थिक दंड वसूल केला जाऊ शकतो.