
जर तुमच्याकडे एलएलबी पदवी असेल, तर तुम्ही भारतीय सैन्यात अधिकारी होऊ शकता. वास्तविक, भारतीय लष्कराने 35 व्या न्यायाधीश ॲडव्होकेट जनरल (JAG) प्रवेश योजनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही प्रवेश योजना ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत, LLB पदवी असलेले अविवाहित पुरुष आणि महिला भारतीय लष्कराच्या JAG शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अधिकारी बनतील. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
उमेदवारांनी नोंद घ्यावी, त्यांच्याकडे अर्ज करण्यासाठी फक्त 9 दिवस आहेत, कारण या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर आहे. या भरती मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांची एकूण 8 पदे भरण्यात येणार असून त्यापैकी 4 पदे पुरुषांसाठी तर 4 पदे महिलांसाठी राखीव आहेत.
कसा करू शकता अर्ज ?
- सर्वप्रथम भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जा.
- त्यानंतर होमपेजवरील ‘इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2024’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक तपशील भरा.
- त्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भविष्यातील गरजांसाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या.
काय आहेत पात्रता निकष ?
उमेदवारांनी किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी (पदवीनंतर 3 वर्षांचा अभ्यासक्रम किंवा 10+2 पूर्ण केल्यानंतर 5 वर्षांचा अभ्यासक्रम) असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे वैध CLAT PG 2024 स्कोअर असणे आवश्यक आहे, तरच ते अर्ज करण्यास पात्र असतील. इतकेच नाही तर, उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडिया किंवा बार कौन्सिल ऑफ स्टेटमध्ये वकील म्हणून नोंदणीसाठी पात्र असावेत. पदवी बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठातून असावी.
किती आहे वयोमर्यादा ?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
तुम्हाला मिळेल किती पगार ?
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) येथे ४९ आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान, त्यांना दरमहा 56,100 रुपये मानधन दिले जाईल. त्याच वेळी, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना सैन्यातील भूमिकेसाठी निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. अधिकारी झाल्यानंतर त्यांना मूळ वेतनाव्यतिरिक्त 15,500 रुपयांच्या लष्करी सेवा वेतनासह विविध भत्तेही मिळतील.
काय आहे निवड प्रक्रिया ?
या पदांसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल, त्यापैकी पहिला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत आणि दुसरी वैद्यकीय चाचणी आहे, ज्यामध्ये उमेदवारांच्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन केले जाईल.
