
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार होती, परंतु आता या स्पर्धेचे यजमानपदही हिरावून घेतले जाऊ शकते. मोठी बातमी अशी आहे की जर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली नाही, तर ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाऊ शकते. आयसीसी यावर विचार करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाने आपल्या भूमीवर यावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, पण बीसीसीआयने याला स्पष्ट नकार दिला आहे. त्याचवेळी, पाकिस्तान हायब्रीड मॉडेल स्वीकारणार नाही, यावरही ठाम आहे. यामुळेच आयसीसी आता आणखी एका पर्यायाचा विचार करत आहे, तो म्हणजे दक्षिण आफ्रिका.
बीसीसीआय, आयसीसीची पाकिस्तानला ‘चपराक’, 16 वर्षांनंतर या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याची तयारी
16 वर्षांपूर्वी 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा विजेता ऑस्ट्रेलिया होता, तर पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदाची लढत झाली, ज्यात कांगारूंनी बाजी मारली. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले, तर ती ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर एक सामना अनिर्णित राहिला आणि शेवटचा सामना जिंकूनही त्याचा काही फायदा झाला नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय फलंदाज अनेकदा संघर्ष करताना दिसतात. 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही असेच काहीसे घडले होते. संपूर्ण स्पर्धेत कर्णधार धोनीला केवळ 3 धावा करता आल्या. सचिनने 2 सामन्यात 8 धावा केल्या. कार्तिक आणि गंभीरही अपयशी ठरले होते. त्या स्पर्धेत केवळ विराट, द्रविड आणि गंभीर यांनाच अर्धशतके पूर्ण करता आली. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली, तर भारतीय फलंदाजांना नक्कीच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पुढची वाटचाल काय असेल हे पाहायचे आहे. आयसीसीच्या या योजनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसह चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यास तयार होण्याची शक्यता आहे. कारण संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेत हलवली, तर पीसीबीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची खात्री आहे.
