
या दिवाळीच्या मुहूर्तावर, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी स्टारर हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया 3’ चित्रपटगृहांमध्ये धमाल करण्यासाठी प्रदर्शित झाला. या चित्रपटासोबतच अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ देखील प्रदर्शित झाला होता, दोन्ही चित्रपटांच्या क्लॅशबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. मात्र, रिलीजनंतर दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला ‘सिंघम अगेन’ कमाईच्या बाबतीत पुढे होता, मात्र आता ‘भूल भुलैया 3’ च्या कलेक्शनने त्याला मागे ढकलले आहे.
Box Office Collection : ‘भूल भुलैया 3’ ने पुन्हा ‘सिंघम अगेन’ला टाकले मागे, कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने जगभरात पार केला 240 कोटींचा आकडा
यावेळी कार्तिक आर्यन आणि तृप्तीच्या या चित्रपटात डबल धमाका झाला, कारण विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या दोघीही यात एकत्र दिसत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातील कमाईत 150 कोटी रुपयांचा टप्पा पार केला, जो चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. आठव्या दिवशीच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘भूल भुलैया 3’ ‘सिंघम अगेन’च्या पुढे आहे.
‘भूल भुलैया 3’ ने आठव्या दिवशी 9 कोटी रुपयांची (अंदाजे कमाई) कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत 167.25 कोटींची कमाई केली आहे. तर ‘सिंघम अगेन’ने आठव्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कमाईवर नजर टाकली तर ‘भूल भुलैया 3’ ने 240.75 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने वीकेंडला ‘सिंघम अगेन’पेक्षा चांगले कलेक्शन केले असून, दुसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला चित्रपट पुन्हा कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
जर आपण ‘भूल भुलैया 2’ च्या कलेक्शनवर नजर टाकली तर चित्रपटाने एकूण 184.32 कोटींची कमाई केली होती, त्या तुलनेत ‘भूल भुलैया 3’ हा बॉक्स ऑफिस कलेक्शनद्वारे फ्रँचायझीचा पहिला चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आहे.
