
न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत टीम इंडियाचा क्लीन स्वीप झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा याच्या निवृत्तीची. 40 वर्षीय दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामानंतर क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे त्याने जाहीर केले. 17 वर्षांच्या कारकिर्दीत साहाने बंगालकडून 15 वर्षे आणि त्रिपुरासाठी 2 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळले.
https://x.com/Wriddhipops/status/1853124866897322232?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1853124866897322232%7Ctwgr%5E3b1430edf845d1ace61f94d3274a26ff74f06031%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fwriddhiman-saha-retire-from-cricket-after-ongoing-ranji-trophy-season-big-news-comes-after-ind-vs-nz-test-2924171.html
साहाने आपल्या क्रिकेट प्रवासाचे वर्णन केले आहे. गेल्या दोन रणजी हंगामात त्रिपुराकडून खेळलेला साहा यावर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा बंगालमध्ये परतला. निवृत्तीची घोषणा करताना साहाने जे सांगितले त्यानुसार तो सध्याच्या रणजी हंगामातच शेवटचा सामना खेळणार आहे.
या भारतीय क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली, मुंबईत खेळली न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी
17 वर्षांच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीत साहाने 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्याने 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच 9 वनडे खेळले. साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला तर मुंबईतील वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. साहाचे वनडे पदार्पण न्यूझीलंडविरुद्ध होते.
