थायलंडमधील या व्यक्तीने केली आहेत 120 हून अधिक लग्ने, जिथे तो घर बांधतो, तिथेच करतो लग्न


जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या विचित्र कारनाम्यांसाठी ओळखले जातात. अशीच एक व्यक्ती सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल आणि असा विचार करू लागाल की असे कोणी कसे काय करू शकते. आम्ही थायलंडच्या नाकोन नायोक प्रांतातील रहिवासी असलेल्या तांबन प्रसेर्टबद्दल बोलत आहोत, ज्याने आपल्या आयुष्यात 120 विवाह केले आहेत. सध्या त्याची कहाणी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेल्या तांबनने आपल्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या फोन नावाच्या मुलीशी लग्न केले, तेव्हा तो जगासमोर प्रकाशझोतात आला. त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की ज्या शहरात तो घर बांधू लागतो, त्याच शहरात त्याचे लग्न होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तांबनच्या सर्व बायकांना त्याच्या लग्नाची चांगलीच माहिती आहे, पण त्यांना याचा त्रास होत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तांबनने हे सर्व विवाह बेकायदेशीरपणे केले आहेत, कारण थायलंडच्या कायद्यानुसार कोणीही एकापेक्षा जास्त लग्न करू शकत नाही आणि हे काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मात्र, तांबन जेव्हा मुलीशी लग्न करतो, तेव्हा तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी आधी तिच्या पालकांशी बोलतो.

यानंतर, तिच्या पालकांनी संमती दिली, तरच त्याचे लग्न होते. जेव्हा स्थानिक मीडियाला या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्या व्यक्तीने स्वतः सांगितले की त्याने 100 पेक्षा जास्त लग्ने केली आहेत. 2017 मध्ये त्याचे शेवटचे लग्न झाले होते आणि जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य उघड केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला की त्याला 120 पेक्षा जास्त बायका आणि 28 पेक्षा जास्त मुले आहेत. माझे पहिले लग्न वयाच्या 17 व्या वर्षी झाले. यानंतर माझ्या आयुष्यात अनेक महिला आल्या. मी माझ्या कामासाठी कुठेही गेलो, मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली मुलगी आवडली, तर मी तिच्याशी लग्न करतो, कारण मला मोठ्या स्त्रिया आवडत नाहीत.

तांबन याने आश्चर्यकारक दावा केला आणि सांगितले की, मला इतक्या बायकांचा काहीही त्रास नाही, कारण मी माझ्या घरच्या सर्व गरजा पूर्ण करतो. माझ्या 22 पेक्षा जास्त बायका फ्रोमनी जिल्ह्यात राहतात, तर बाकीच्या थायलंडमध्ये इतर ठिकाणी राहतात. तथापि, थायलंडमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तांबन यांना कायदेशीर समस्यांनाही सामोरे जावे लागले असते, पण त्याबाबत काही सांगणे कठीण आहे.