Diwali 2024 : दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी या गोष्टी सापडणे असते खूप शुभ, आर्थिक तंगी होते दूर!


दसरा संपताच प्रत्येक घरात दिव्यांचा सण दिवाळीची तयारी सुरू होते. अनेकदा लोक दिवाळीच्या अनेक दिवस आधी घराची साफसफाई करायला सुरुवात करतात आणि मग सजावट केली जाते. दिवाळीनिमित्त बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 ला साजरी होणार आहे. मात्र, यावेळी दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रामध्ये दिवाळीच्या स्वच्छतेशी संबंधित विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार दिवाळीत साफसफाई करताना काही विशेष गोष्टी सापडल्यास ते शुभ मानले जाते. या गोष्टी शोधणे हे सूचित करते की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे आणि तुम्हाला भविष्यात खूप पैसा मिळणार आहे. चला जाणून घेऊया दिवाळीत साफसफाई करताना कोणत्या गोष्टी शुभ मानल्या जातात.

या गोष्टी सापडणे असते शुभ

पैसे सापडणे – अनेक वेळा आपण कपड्याच्या खिशात किंवा पर्समध्ये पैसे ठेवून विसरतो. दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी जर तुम्हाला असे पैसे ठेवलेले सापडले, तर ते तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असल्याचे लक्षण आहे. यामुळे लवकरच घरात पैसा येईल.

शंख किंवा कौड्या – दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी तुम्हाला शंख किंवा कौड्या सापडल्यास ते एक अद्भुत शुभ चिन्ह आहे. पैसा मिळाला, तर अपार संपत्ती आणि समृद्धीसोबतच पद आणि प्रतिष्ठाही मिळेल.

मोरपंख – दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी मोरपंख मिळणे खूप शुभ आहे. जीवनातील समस्या दूर होण्याचे हे लक्षण आहे. तुम्हाला आर्थिक फायदाही होईल आणि तुमच्या आयुष्यात गोडवा येईल.

तांदूळ (अक्षता) – तांदळाचा संबध धन आणि विलास देणाऱ्या शुक्र ग्रहाशी आणि आई लक्ष्मीशी आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मात अक्षताशिवाय पूजा पूर्ण होत नाही. दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी डब्यात तांदूळ सापडणे हे नशीब आणि संपत्तीच्या आगमनाचे लक्षण आहे.

लाल रंगाचे कापड – धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये लाल रंगाचे कापड किंवा ओढणी पसरवणे शुभ मानले जाते, कारण लाल रंग लक्ष्मीला प्रिय आहे. दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी लाल कापड किंवा लाल ओढणी सापडणे हे चांगले दिवस येणार असल्याचे सूचित करते.