Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने झळकावले 18 वे द्विशतक, आता तो करणार टीम इंडियात पुनरागमन?


चेतेश्वर पुजारा टीम इंडियातून बाहेर असला, तरी हा खेळाडू अजूनही धावा करत आहे. पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळत असून या अनुभवी खेळाडूने छत्तीसगडविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पुजाराने छत्तीसगडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. पुजाराने 350 हून अधिक चेंडूंचा सामना करत द्विशतक झळकावले. वृत्त लिहिपर्यंत पुजाराने आपल्या खेळीत 22 चौकार मारले होते. मोठी गोष्ट म्हणजे पुजाराने प्रथम श्रेणी कारकिर्दीत 18 व्यांदा द्विशतक झळकावले.

चेतेश्वर पुजारा हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावणारा खेळाडू आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 18 द्विशतके झळकावली आहेत. यानंतर विजय मर्चंट यांनी 11 द्विशतके आणि विजय हजारेंनी 10 द्विशतके झळकावली. गावस्कर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरही 10-10 द्विशतके आहेत. तथापि, सर्वाधिक द्विशतकांचा विश्वविक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे, ज्यांनी 37 वेळा ही कामगिरी केली. हॅमंडने 36 द्विशतके झळकावली होती.
https://x.com/ImTanujSingh/status/1848308907678003314?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1848308907678003314%7Ctwgr%5E15432cacc05ed31665bfec1adc435a49127237ca%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fcheteshwar-pujara-double-century-ranji-trophy-chhattisgarh-vs-saurashtra-2900497.html
चेतेश्वर पुजारा 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. हा खेळाडू सातत्याने धावा करत टीम इंडियामध्ये पुनरागमनाचे दरवाजे ठोठावत आहे. पुजाराने यावर्षी 16 सामन्यात 6 शतके झळकावली आहेत. तसेच या द्विशतकादरम्यान त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजार धावा पूर्ण केल्या. पुजाराच्या नावावर 66 प्रथम श्रेणी शतके आहेत आणि तो ब्रायन लाराच्या पुढे गेला आहे.

टीम इंडियाला पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे त्यांना पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्या दौऱ्यात पुजारा टीम इंडियाला उपयुक्त ठरू शकतो. पुजाराची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सरासरी 50 च्या आसपास आहे आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर त्याने 3 शतकांच्या मदतीने 993 धावा केल्या आहेत आणि त्याची फलंदाजी सरासरी 47 पेक्षा जास्त आहे. जर टीम इंडिया अनुभव घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली, तर पुजारा योग्य दावेदार होऊ शकतो.