Virat Kohli 9000 Runs : कसोटीत 9000 धावा पूर्ण करून विराट कोहलीने केला हा खास विक्रम


विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात येतो, तेव्हा काहीतरी ना काही नक्कीच घडते, जे चाहत्यांची मने जिंकते. यावेळी किंग कोहलीने बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आणि यासोबतच त्याने कसोटीत 9000 धावाही पूर्ण केल्या. विराट कोहलीने 197 कसोटी डावांमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठला. विराट कोहलीच्या 9000 कसोटी धावा खास आहेत, पण या खेळाडूचे बंगळुरू कसोटीतले अर्धशतकही खास आहे. कारण टीम इंडिया बंगळुरूमध्ये संकटात सापडली आहे आणि याच क्षणी विराटने अर्धशतक झळकावले.

कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम यापूर्वी केला आहे. मात्र, या महान खेळाडूंमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक डाव खेळून 9000 चा आकडा गाठला आहे. द्रविडने 176 डावांमध्ये 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनने 179 डावात ही कामगिरी केली होती. 9000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी गावस्कर यांनी 192 डाव आणि विराटला 197 डाव लागले.
https://x.com/CricCrazyJohns/status/1847234585517842864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1847234585517842864%7Ctwgr%5E67f193413c5d1cc522d646df9a4dd03ddc7435e1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fvirat-kohli-completes-9000-test-runs-fifty-india-vs-new-zealand-2895068.html
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 9000 धावा करण्याचा विश्वविक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. त्याने 172 डावात ही कामगिरी केली. स्टीव्ह स्मिथने 174 डावात 9000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. राहुल द्रविड तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले, तर हा खेळाडू भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर 15000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय ठरला आहे. आतापर्यंत केवळ पाँटिंग, संगकारा आणि केन विल्यमसन यांनी ही कामगिरी केली आहे.