
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 15 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारले जात आहेत. इच्छुक उमेदवार 28 ऑक्टोबरपर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइट westerncoal.in वर जाऊन अर्ज भरू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. इतर माध्यमातून केलेले अर्ज वैध राहणार नाहीत.
WCL Recruitment 2024 : ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती, तुम्हाला परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, 10वी पासही करू शकतात अर्ज
कंपनी या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 902 पदे भरणार आहे. एकूण पदांमध्ये ITI ट्रेड अप्रेंटिसच्या 841 पदे आणि फ्रेशर्स ट्रेड अप्रेंटिसच्या (सुरक्षा रक्षक) 61 पदांचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि वयोमर्यादा काय असावी ते आम्ही तुम्हाला सांगतो.
ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI पदवी असणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. तर कमाल वयोमर्यादेत OCB प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची आणि SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अशाप्रकारे करा अर्ज
- कंपनीच्या अधिकृत वेबसाइट westerncoal.in ला भेट द्या.
- होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर जा.
- ट्रेड अप्रेंटिस येथे जा.
- आता अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करा आणि अर्ज भरा.
WCL Trade Apprentice Recruitment 2024 notification
WCL Trade Apprentice Recruitment 2024 Apply Link
या पदांसाठी अर्जदारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्तेद्वारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही जारी केलेली अधिसूचना तपासू शकता.
