‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मधून का काढला जाणार ‘स्त्री 2’चा सीन? दिग्दर्शकही मागत आहे माफी ो


राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ 11 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. ‘स्त्री 2’ मध्ये चमत्कार केल्यानंतर राजकुमार रावचा हा पुढचा चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटाची तुलना ‘स्त्री 2’शी केली, तर लोकांना तो फारसा आवडलेला नाही. चित्रपटात कॉमेडीसोबतच हॉरर जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जो आता निर्मात्यांना चांगलाच महागात पडला आहे.

‘स्त्री 2’ चा संदर्भ राज शाडिल्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’च्या एका दृश्यात घेण्यात आला आहे, निर्मात्यांनी ‘स्त्री 2’ चा सीन वापरण्यापूर्वी निर्मात्याची परवानगी घेतली नव्हती. यामुळे दिग्दर्शकावर आता माफी मागण्यापर्यंतची वेळ आली आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मध्ये ‘स्त्री 2’ चा संदर्भ घेण्यामागचा हेतू हा होता की लोक त्याच्याशी सहज कनेक्ट होऊ शकतील. पण ‘स्त्री 2’ची निर्माती मॅडॉक फिल्म्सची परवानगी न घेता चित्रपटात त्याचा वापर करण्यात आला आहे, जे चुकीचे आहे.

अलीकडेच, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’च्या दिग्दर्शकाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर आपली चूक सुधारण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने माफी मागितली आहे. त्याने लिहिले आहे, “मी, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्य, माझ्या स्वत:च्या वतीने आणि चित्रपटाचे निर्माते, सुपर कॅसेट्स इंडस्ट्री लिमिटेड, बालाजी मोशन पिक्चर्स आणि वाकाओ फिल्म्स यांच्या वतीने, चित्रपटात मॅडॉक फिल्म्सची फ्रँचायझी ‘स्त्री’चे पात्र आणि संवादांच्या अनधिकृत वापराबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहोत. यामुळे मॅडॉक फिल्म्स आणि तिच्या फ्रेंचायझीचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

तो पुढे म्हणाले, “आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने पावले उचलत आहोत आणि आमच्या चित्रपटातून ‘स्त्री’चा भाग काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. ही प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय भविष्यात अशा अनधिकृत पद्धतींचा वापर होणार नाही याची काळजी घेऊ. आम्ही पुष्टी करतो की आमचा चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ कोणत्याही प्रकारे मॅडॉक फिल्म्सच्या फ्रेंचाइजी ‘स्त्री’ किंवा चित्रपटातील कोणत्याही पात्राशी जोडलेला नाही. याशिवाय आम्ही ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ च्या कोणत्याही पात्रावर बौद्धिक संपदा हक्क असल्याचा दावाही करत नाही.”