
भारतात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत अनेक स्थानिक ब्रँड लोकप्रिय होत आहेत, इंडिया मेड फॉरेन लिकरचीही देशात वेगळी क्रेझ पाहायला मिळत आहे. पण विदेशी मद्य पिण्याचे शौकीन असलेल्यांसाठी ही बातमी आहे, कारण येत्या काळात विदेशी व्हिस्की प्रत्येक पार्टीची शान वाढवू शकते. कारण देशात लवकरच विदेशी मद्याची किंमत कमी होणार आहे.
India Europe Free Trade Agreement : मद्यप्रेमींसाठी खुशखबर, लवकरच स्वस्त होणार ब्रँडेड व्हिस्की
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) संदर्भात चर्चेची 9वी फेरी सुरू झाली आहे. या बैठकीत अनेक वस्तूंवरील आयात शुल्क कमी करणे आणि कार्बन टॅक्समधून सवलत देण्याबाबत चर्चा होणार आहे. मद्यावरील कर कमी करणे हाही या बैठकीचा महत्त्वाचा अजेंडा आहे.
युरोपियन युनियनची मागणी आहे की भारताने युरोपमधून येणाऱ्या व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी करावे. सध्या देशात विदेशी मद्यावर 150 टक्के कर आहे. FTA अंतर्गत, भारताने पुढील 10 वर्षांमध्ये आयात शुल्क 150 वरून 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर भारताची इच्छा आहे की येथे उत्पादित व्हिस्कीचा परिपक्वता कालावधी युरोपमध्ये निर्यात करण्यासाठी कमी केला जावा.
सध्या युरोपमध्ये, फक्त 3 वर्ष जुन्या व्हिस्कीच्या आयातीला परवानगी आहे, तर ब्रँडीसाठी ही मर्यादा 1 वर्षाची आहे. FTA च्या अटींवर सहमती देण्यासाठी व्हिस्कीचे परिपक्वतेचे वय 3 वर्षांपेक्षा कमी करावे अशी भारताची इच्छा आहे.
भारत आणि युरोपमधील एफटीए संदर्भात ही चर्चा सुमारे 8 वर्षांनंतर जून 2022 मध्ये पुन्हा सुरू झाली. त्यापूर्वी 2013 मध्ये अनेक विरोधाभासांमुळे 2007 मध्ये सुरू झालेल्या या चर्चा थांबल्या होत्या. या FTA अंतर्गत युरोपला भारतातून निर्यात होणाऱ्या 95 टक्के वस्तूंवर करात सूट हवी आहे. यामध्ये ऑटोमोबाईल्स आणि कृषी उत्पादनांचा समावेश आहे. त्याचबरोबर भारताला त्याच्या उत्पादन वस्तू आणि सेवा क्षेत्रासाठी युरोपमध्ये मोठी बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि युरोपमधील एकूण व्यापार 2023 मध्ये $200 अब्जच्या पुढे जाईल. भारताने 2023 मध्ये युरोपियन युनियनच्या 27 देशांना $75.18 अब्ज किमतीच्या वस्तू आणि $31.13 अब्ज किमतीच्या सेवांची निर्यात केली आहे, तर युरोपियन युनियनची भारताला एकूण निर्यात सुमारे $103 अब्ज इतकी आहे.
