स्वतःचा संघ सांभाळता येत नाही आणि यशस्वी जैस्वालला कसे खेळायचे हे शिकवत आहे माजी पाकिस्तानी क्रिकेटर


पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अनेकदा भारतीय संघाविरोधात वक्तव्ये करून चर्चेत राहतात. शोएब अख्तर असो, शाहिद आफ्रिदी, कामरान अकमल किंवा रशीद लतीफ, हे सर्वजण भारतीय संघावर भाष्य करून सोशल मीडियावर स्वत:ला लोकप्रिय करतात. आता माजी क्रिकेटर बासित अलीने असेच काहीसे केले आहे. बासित अलीने आता टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालवर टिप्पणी केली आहे, जी अतिशय हास्यास्पद आहे. बासित अलीने त्याच्या यूट्यूब लाइव्हवर सांगितले की, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ज्या प्रकारे यशस्वी जैस्वाल बाद झाला, ती टीम इंडियासाठी गंभीर चिंतेची बाब आहे.

यशस्वी जैस्वालवर निशाणा साधत बासित अली म्हणाला, यशस्वी जैस्वालने दोन्ही डावात खूप वाईट शॉट्स खेळले. माझ्यासाठी हा सामना जैस्वालसाठी शून्य होता, पण त्याने शिकले पाहिजे. आता शिकला नाही, तर कधी शिकणार? जेव्हा तुमच्याकडे फॉर्म असेल, तेव्हा तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. खराब फटके खेळून विकेट गमावू नये. टीम इंडियासाठी ही चिंतेची बाब आहे.

यशस्वी जैस्वालला दोन्ही डावात वेगवान गोलंदाज नाहिद राणाने बाद केले. दोन्ही वेळा तो ऑफ स्टंपबाहेर खराब फटके खेळून बाद झाला. मात्र, पहिल्या डावात त्याने अर्धशतक झळकावले. जैस्वालने पहिल्या डावात 56 तर दुसऱ्या डावात 10 धावा केल्या. साहजिकच जैस्वालची ही चांगली कामगिरी नसून केवळ एका डावात अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. पाकिस्तानचे माजी खेळाडू अनेकदा त्यांच्याच खेळाडूंवर अशा कमेंट करतात आणि त्यांच्या विरोधात वातावरण तयार केले जाते. आता भारताच्या युवा खेळाडूंवरही अशाच प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पण कदाचित त्यांना माहित नसेल की भारतीय खेळाडूंची मानसिकता पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा थोडी वेगळी आहे.

यशस्वी जैस्वालचे वय अवघे 22 वर्षे असून त्याने १० कसोटी सामन्यात 1094 धावा केल्या आहेत. त्याची टेस्ट सरासरी 64 पेक्षा जास्त आहे. तसेच, त्याने तीन शतके झळकावली आहेत, त्यापैकी दोन द्विशतके आहेत. जैस्वालला धावा कशा करायच्या हे माहित असून तो लवकरच बासित अलीला आपल्या कामगिरीने शांत करणार आहे.