
हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची पूजा सुरू होते. यावर्षी शारदीय नवरात्र गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा मुख्य उद्देश दुर्गा देवीची पूजा करणे आणि तिचा आशीर्वाद घेणे हा आहे.
Shardiya Navratri : या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात? जाणून घ्या नऊ दिवस काय करावे आणि काय करू नये
असे मानले जाते की या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गा पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांचे रक्षण करते. मान्यतेनुसार नवरात्रीचे दिवस खूप पवित्र असतात, या दिवसांमध्ये तुम्ही उपवास जरी ठेवला नसला, तरी या दिवसांमध्ये काही काम चुकूनही करू नये. नवरात्रीत काही काम अवश्य करावे, असे केल्याने नवरात्रीच्या उपासनेचे शुभ फळ मिळतात, चला जाणून घेऊया.
पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 12.19 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.58 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून होईल आणि हा उत्सव शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी संपेल.
शारदीय नवरात्रीत करा या गोष्टी
- दुर्गा मातेला लाल रंग खूप आवडतो. लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला लाल फुले अर्पण करा आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करा.
- नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करा. दुर्गा मातेला दररोज नवीन फुले, फळे आणि मिठाई खासकरुन अर्पण करा.
- नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करा आणि ध्यान करा. यामुळे मनःशांती आणि एकाग्रता वाढते आणि कुटुंबात आनंद मिळतो.
- नवरात्रीच्या पवित्र दिवसात गरजूंना दान करा किंवा त्यांची सेवा करा. हे अत्यंत पुण्यपूर्ण कर्म मानले जाते आणि ते केल्यास शुभ फळ मिळते.
शारदीय नवरात्रीत चुकूनही करू नका या गोष्टी
- नवरात्रीचे 9 दिवस अखंड दिवा पेटवणे खूप शुभ मानले जाते, परंतु जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल, तर घर कधीही रिकामे ठेवू नका आणि अखंड दिवा विझू देऊ नका.
- नवरात्रीच्या 9 दिवसांत चुकूनही तामसिक अन्न आणि मद्य सेवन करू नये.
- नवरात्रीच्या काळात नकारात्मकतेपासून दूर राहून चांगल्या विचारांचा अंगीकार करा आणि कोणत्याही प्रकारचे वाद, भांडण टाळा.
- पूजा करताना शिस्त अवश्य पाळावी. नवरात्रीच्या काळात वेळेवर उठणे आणि माता राणीची भक्तिभावाने पूजा करणे आवश्यक आहे.
