‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे कंगना राणावतला करावे लागले हे काम, झाले मोठे नुकसान


बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत सध्या तिचा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्यामुळे कंगना खूपच नाराज आहे. ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता, परंतु शीख समुदायाच्या विरोधामुळे काही काळासाठी रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तिच्यावर आणखी एक संकटाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाला तिचा मुंबईतील बंगला विकावा लागला आहे. असे करण्यामागचे कारणही कंगनाने दिले आहे. हा तोच बंगला आहे, ज्यावर बीएमसीने बुलडोझर फिरवला होता.

न्यूज 18 शी केलेल्या संभाषणात कंगनाने सांगितले की, इमर्जन्सी रिलीज होण्यास उशीर झाल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. कंगना म्हणाली, “साहजिकच माझा चित्रपट रिलीज व्हायला हवा होता. मी माझी सर्व संपत्ती यावर गुंतवली आहे. आता तो रिलीज न झाल्याने मला अडचणी येत आहेत. बरं, तुम्ही अशा वेळी तुमची मालमत्ता वापरता. जसे की, जर तुम्हाला कधी वाईट वेळ येत असेल, तर तुम्ही ते विकू शकता. आता तुम्ही मला याचेही स्पष्टीकरण मागत आहात.” कंगनाने हा बंगला 32 कोटी रुपयांना विकला आहे.

कंगनाने सप्टेंबर 2017 मध्ये 20.7 कोटी रुपयांना बंगला खरेदी केल्याचे झॅपकीच्या अहवालातून समोर आले आहे. बंगल्याच्या बदल्यात तिने डिसेंबर 2022 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 27 कोटी रुपयांचे कर्जही घेतले होते. हा बंगला तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचे कार्यालय म्हणून वापरला जात होता. सप्टेंबर 2020 मध्ये, बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगनाच्या वांद्रे येथील बंगल्याचा काही भाग पाडला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तोडण्याचे काम मध्यंतरी थांबवण्यात आले. यानंतर कंगनाने बीएमसी विरोधात गुन्हा दाखल केला आणि बीएमसीकडे नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची मागणीही केली, परंतु मे 2023 मध्ये आपली मागणी मागे घेतली. कंगनाचा हा बंगला 3,075 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला असून, त्यातील पार्किंग 565 स्क्वेअर फूट आहे.
https://x.com/KanganaTeam/status/1831927010823999759?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1831927010823999759%7Ctwgr%5Eb6409fb5f652fce2f9566046bf0b40df057fa69b%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fentertainment%2Fbollywood-news%2Fkangana-ranaut-due-to-film-emergency-sell-her-mumbai-office-space-due-to-delay-in-release-2837606.html
कंगना राणावतचा इमर्जन्सी हा चित्रपट 6 सप्टेंबरला थिएटरमध्ये येणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीमुळे तो पुढे ढकलण्यात आला. चित्रपटात शीखांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, असे अनेक शीख संघटनांनी म्हटले आहे. त्यांच्या मते चित्रपटात तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. समुदायाचा दावा आहे की चित्रपट तणाव आणि चुकीची माहिती पसरवू शकतो. हा चित्रपट 1975 मध्ये देशात झालेल्या राजकीय गोंधळावर आधारित आहे. कंगनाने या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित करण्यासाठी झी स्टुडिओने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सेन्सॉर प्रमाणपत्राची मागणी केली होती. अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.