
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगना राणावतने तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. तिच्या चित्रपटाचे नाव ‘भारत भाग्य विधाता’ असे असेल. कंगनाने या चित्रपटाची माहिती X (ट्विटर) वर दिली आहे. हा चित्रपट अनसंग हिरोंवर आधारित असेल. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकासोबत स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. मनोज तापडिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
Bharat Bhhagya Viddhaata : एकीकडे इमर्जन्सीचे रिलीज अडकले, तर दुसरीकडे कंगना राणावतने केली नवीन चित्रपटाची घोषणा
कंगना राणावतने एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “मोठ्या पडद्यावर वास्तविक जीवनातील वीरतेची जादू अनुभवा. भारत भाग्य विधाता जाहीर करताना खूप आनंद होत आहे. हा चित्रपट अनसन्ग हिरोंना श्रद्धांजली ठरेल. प्रतिभावान निर्मात्या बबिता आशिवाल आणि आदि शर्मा आणि दूरदर्शी दिग्दर्शक आणि लेखक मनोज तापडिया यांच्यासोबत.
Experience the magic of real-life heroism on the big screen!
Ecstatic to announce Bharat Bhhagya Viddhata, a cinematic tribute to the unsung heroes, with talented producer duo Babita Ashiwal & Adi Sharmaa, and visionary director-writer Manoj Tapadia.
Eunoia films and Floating… pic.twitter.com/p9NRtWetdN— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 3, 2024
‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातून सर्वसामान्यांच्या असामान्य कामगिरीचे दर्शन घडणार आहे. मनोज तापडिया यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सिनेमाशिवाय मनोज जाहिरातींच्या दुनियेतही सक्रिय आहे. प्रॉडक्शन हाऊस आयनोइयाच्या प्रमुख बबिता आशिवाल यांनी सांगितले की, भारत भाग्य विधातामध्ये काम करणे हे पुरस्कारासारखे आहे. त्या म्हणाल्या, आमच्या प्रेक्षकांना आवडेल असे काहीतरी तयार करणे हा आमचा उद्देश आहे. आता कंगना या चित्रपटाचा एक भाग असल्याने आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट चांगली कामगिरी करेल.
फ्लोटिंग रॉक्स एंटरटेनमेंटचे आदि शर्मा म्हणाले की, या चित्रपटासाठी कंगना राणावतसोबतचे आमचे सहकार्य सीमा ओलांडून प्रेक्षकांशी भावनिक आणि खोलवर कनेक्ट होऊ शकेल अशी सामग्री तयार करण्यावर केंद्रित आहे. चांगले चित्रपट हेच ब्लॉकबस्टर यशाचे भविष्य असल्याचे ते म्हणाले.
बऱ्याच दिवसांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत असलेला कंगना राणावतचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ पुन्हा एकदा अडकला आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाकडून (सीबीएफसी) प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट अडकला आणि त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. मात्र, त्याची पुढील रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंगना राणावतने या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि सहलेखन केले आहे. याशिवाय कंगनाने त्याची निर्मितीही केली आहे.
या चित्रपटात कंगना राणावतने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. अनेक शीख संघटनांनी या चित्रपटाबाबत निषेध नोंदवला आहे. या चित्रपटामुळे जातीय हिंसाचार होऊ शकतो आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात विशाक नायर (संजय गांधी), मिलिंद सोमण (फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ), श्रेयस तळपदे (अटल बिहारी वाजपेयी), सतीश कौशिक (जगजीवन राम), अनुपम खेर (जय प्रकाश नारायण) आणि अधीर भट्ट (फिरोज गांधी) यांच्याही भूमिका आहेत.
