Paris Paralympics : एवढी उंच उडी मारली की रचला नवा इतिहास, निषाद कुमारच्या या उडीने भारताला मिळवून दिले ‘रौप्य’


निषाद कुमार नवा इतिहास लिहीत असताना भारतात रात्र झाली होती. तो इतिहास रचला त्याला किती जणांनी पाहिले माहीत नाही, पण ज्यांनी पाहिले त्यांची चांगलीच झोप उडाली असेल. होय. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय उंच उडीपटू निषाद कुमारने जे केले, ते खूपच कौतुकास्पद आहे. टोकियोपाठोपाठ पॅरिसमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत 25 वर्षीय निषाद कुमारने रौप्यपदक पटकावले आहे. यासह, बॅक टू बॅक पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणारा तो सर्वात तरुण पॅरा-ॲथलीट बनला आहे.

आता प्रश्न असा आहे की निषाद कुमारने हे सर्व कसे केले? ज्यामुळे त्याने पुरुषांच्या T47 उंच उडी स्पर्धेत भारताला ‘रौप्य’ मिळवून दिले. या स्पर्धेत निषाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचे 2.04 मीटर उडी मारून रौप्य पदक जिंकले. अशाप्रकारे त्याने देशासाठी 7 वे पदक जिंकले.

ज्या स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने रौप्यपदक जिंकले, त्याच स्पर्धेचे सुवर्णपदक अमेरिकेच्या रॉड्रिक टाऊनसेंड-रॉबर्ट्सच्या नावावर होते. अमेरिकन हाय जम्परने 2.08 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. पॅरालिम्पिक स्पर्धेत यूएसए ऍथलीटचे हे सलग तिसरे सुवर्ण आहे. निषादने यूएसए हाय जम्परला मागे टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला असला, तरी त्याला यश आले नाही आणि त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पुरुषांच्या T47 उंच उडी स्पर्धेत कांस्यपदक NPA च्या जी. मार्गीव्हला मिळाले, ज्याने पूर्ण 2 मीटर उडी मारली. निषाद कुमार व्यतिरिक्त, आणखी एक भारतीय जम्पर राम पाल यानेही याच स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु त्याला 1.95 मीटरपेक्षा उंच उडी मारता आली नाही. राम पाल सातव्या क्रमांकावर होता.

निषाद कुमारने भारतासाठी 7 वे पदक जिंकले. निषादने मिळवलेल्या यशानंतर, 1 सुवर्ण पदकाव्यतिरिक्त, भारताच्या खात्यात आता 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत.