
पाकिस्तानचा संघ जिथे जाईल, तिथे त्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. टी-20 विश्वचषकात पराभव पत्करावा लागल्यानंतर महिला आशिया चषक स्पर्धेत त्यांचा संघ हरला आणि आता पाकिस्तान अ संघ बांगलादेश अ संघाविरुद्धचा सामनाही हरला. डार्विन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात बांगलादेश अ संघाने पाकिस्तान अ संघाचा 5 धावांच्या अल्पशा फरकाने पराभव केला. एक काळ असा होता की हा सामना पाकिस्तानचा विजय निश्चित वाटत होता, पण शेवटी बांगलादेशच्या पार्ट टाईम गोलंदाजाने दमदार गोलंदाजी करत पाकिस्तान-अ च्या तोंडून विजय हिसकावून घेतला.
पुन्हा कापले गेले पाकिस्तानचे नाक, बांगलादेशच्या या संघाने तोंडातून हिसकावून घेतला विजय, पार्ट टाईम गोलंदाजाने केला कहर
2nd Four-day match – Pakistan Shaheens vs Bangladesh A
Bangladesh A won by 5 runs.
Bangladesh A: 258 & 216
Pakistan Shaheens: 179 & 290Scorecard: https://t.co/j06EFVOSL9#PAKvBAN
— Pakistan Cricket Live (@TheRealPCB_Live) July 29, 2024
पाकिस्तान अ संघाला दुसरी अनधिकृत कसोटी जिंकण्यासाठी 296 धावा करायच्या होत्या, पण तो 290 धावांवर कोसळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तान अ विरुद्ध पार्ट टाईम गोलंदाज असलेल्या महमुदुल हसन जॉयने दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. या खेळाडूने आपल्या कारकिर्दीत केवळ 8 विकेट्स घेतल्या होत्या. एकवेळ पाकिस्तानने 287 धावा केल्या होत्या आणि त्यांच्या 2 विकेट शिल्लक होत्या. हा संघ नक्कीच जिंकेल असे वाटत होते, पण जॉय आणि मुराद यांनी शेवटच्या दोन विकेट घेत बांगलादेश-अ ला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
महमुदुल हसन जॉयने केवळ चेंडूने चमत्कार दाखवला नाही. बांगलादेश-अ च्या कर्णधाराने दोन्ही डावात शानदार अर्धशतके झळकावली. जॉयने पहिल्या डावात 90 चेंडूत 69 धावा केल्या. पुढच्या डावात त्याच्या बॅटमधून पुन्हा 65 धावा आल्या. जॉयच्या स्फोटक अष्टपैलू खेळामुळे, अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. पाकिस्तान-अ संघाने पहिला सामना 148 धावांनी जिंकला होता. आता दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. हे सामने डार्विनमध्येच होणार आहेत. पहिला एकदिवसीय सामना 4 ऑगस्टला तर दुसरा एकदिवसीय सामना 6 ऑगस्टला होईल.
