
रिलायन्स जिओने नुकतेच रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. दरवाढीनंतर लोकांच्या खिशावर बोजा वाढला आहे. मात्र, जिओच्या एका निर्णयामुळे युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. टेलिकॉम कंपनीने 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची वैधता वाढवली आहे. आता हा प्लान खरेदी केल्यावर तुम्हाला 30 दिवसांची पूर्ण वैधता मिळेल. ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी Rs 349 च्या प्लॅनची वैधता वाढवणे खूप महत्वाचे आहे. जिओ आता Hero 5G च्या नावाने हा प्लॅन ऑफर करत आहे.
Reliance Jio : 349 रुपयांच्या प्लॅनची वैधता वाढली, आता 30 दिवसांची मिळणार वैधता
रिचार्ज प्लॅनची वैधता वाढवणे हा एक मोठा बदल आहे. ग्राहकांच्या फीडबॅकच्या आधारे वैधता वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिओने दैनिक, मासिक आणि वार्षिक प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. परंतु 30 पर्यंत वैधता वाढवल्याने जिओ वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळेल. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये काय मिळेल? ते आम्ही तुम्हाला सांगतो.
रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर, वापरकर्त्यांना 30 दिवसांची वैधता मिळेल. यापूर्वी हे रिचार्ज केल्यावर केवळ 28 दिवसांची वैधता मिळत होती. दररोज 2GB डेटा राखून ठेवण्यात आला आहे, परंतु वाढीव वैधता, तुम्हाला आता एकूण 60GB डेटा मिळेल. आधी फक्त 56GB डेटा मिळत होता.
ज्या भागात Jio ने True 5G सेवा जारी केली आहे, तेथे अमर्यादित 5G इंटरनेट देखील मिळू शकते. दरम्यान गेल्या महिन्यात रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर अनेक प्लॅनच्या किमती बदलल्या. 1GB डेटा प्रतिदिन प्लॅनची किंमत 209 रुपयांवरून 249 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळत होता, ज्याची किंमत 799 रुपये झाली आहे. याशिवाय 2,999 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळत होता. आता या प्लानची किंमत 3,599 रुपये झाली आहे.
