T20 World Cup : सेमीफायनलपूर्वी मिळाली सूर्यकुमार यादवला वाईट बातमी, आता त्याला कोणत्याही किंमतीला करावे लागणार हे काम


आता 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी थोडाच वेळ शिल्लक आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत टीम इंडियाला इंग्लंडच्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे, मात्र या सामन्यापूर्वीच भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला एक वाईट बातमी मिळाली आहे. सूर्यकुमार यादव आता जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा T20 फलंदाज नाही. ट्रॅव्हिस हेडने सूर्यकुमारची जागा घेतली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत हा ऑस्ट्रेलियन फलंदाज अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर भारतीय फलंदाजाला एक स्थान गमवावे लागले आहे.

ट्रॅव्हिस हेड 844 रेटिंग गुणांसह ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 4 स्थानांनी उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला. ट्रॅव्हिस हेडने भारताविरुद्ध 76 धावांची खेळी खेळली आणि या स्पर्धेत त्याने 255 धावा केल्या. यामुळेच तो टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवनेही सलग दोन अर्धशतके झळकावली असली, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो 31 धावा करू शकला आणि बांगलादेशविरुद्धही त्याने त्याच्या बॅटमधून केवळ 6 धावा केल्या. यामुळे त्याने आपले नंबर 1 रँकिंग गमावले.

मात्र, सूर्यकुमार यादवला पुन्हा एकदा नंबर 1 टी-20 फलंदाज बनण्याची संधी आहे. सूर्यकुमारला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळायचे आहे आणि जर संघ जिंकला, तर त्याला फायनल खेळण्याचीही संधी मिळेल. सूर्याने दोन्ही सामन्यात मोठी खेळी केली, तर तो अव्वल स्थानावर नक्कीच पोहोचेल. चांगली गोष्ट म्हणजे इंग्लंडविरुद्ध त्याची बॅट चालली आहे. या खेळाडूने इंग्लंडविरुद्ध 45 पेक्षा जास्त सरासरीने 274 धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. सूर्याचा स्ट्राइक रेटही 190 पेक्षा जास्त आहे. ट्रॅव्हिस हेडचा नंबर 1 होण्याचा आनंद फार काळ टिकणार नाही, हे स्पष्ट आहे.