
पावसाळ्यात वाहनाची विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे वाहनाचे हजारो-लाखोंचे नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही सामान्य पण महत्वाची माहिती सांगणार आहोत, ज्या सामान्यतः लोकांना माहित असतात, पण पावसाळ्यात गाडी चालवताना लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.
Car Monsoon Tips : पावसाळ्यात सुरक्षित कार चालवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, सुरळीत होईल प्रवास
पावसाळ्यात गाडी चालवताना रस्त्याच्या मधोमध गाडी चालवली पाहिजे, असे तुम्हाला वाटत नसेल, तर आजच या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टी लक्षात ठेवून पावसाळ्यात गाडी चालवली, तर रस्त्यावर कोणतीही अडचण येणार नाही.
सर्वप्रथम, तुमच्याकडे हॅचबॅक, सेडान किंवा एसयूव्ही असली, तरीही जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल आणि जेव्हा पाणी भरलेल्या रस्त्यावरून जाल, तेव्हा अशा रस्त्यावरून जाण्यापूर्वी तुमच्या वाहनाचा ग्राउंड क्लिअरन्स लक्षात ठेवा. हॅचबॅक आणि सेडान वाहनांचा ग्राउंड क्लीयरन्स कमी असतो, याचा अर्थ इंजिनमध्ये पाणी जाण्याचा धोका जास्त असतो. पण असे नाही की जर तुमच्याकडे एसयूव्ही असेल, तर तुम्ही पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून धैर्याने गाडी घेऊन जाऊ शकता, एसयूव्हीच्या इंजिनमध्येही पाणी जाऊ शकते.
आधी तुमच्या पुढे जाणारी वाहने पाण्यातून बाहेर पडताना पहा आणि मग तुमच्या वाहनाचा ग्राउंड क्लीयरन्स लक्षात घेऊन तुम्ही त्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जावे की नाही ते ठरवा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्याच्या तुलनेत, सामान्य दिवसात रस्त्यावर विहित वेगाने वाहन चालवण्यास कोणतीही अडचण येत नाही, परंतु पावसामुळे रस्ता ओला असल्यामुळे रस्त्यावरील टायरची पकड तितकीशी मजबूत नसते. यामुळेच पावसाळ्यात रस्त्यासाठी निर्धारित वेगापेक्षा कमी वेगाने कार चालवण्याचा सल्ला दिला जातो.
