Pre Booking : प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’चा रिलीज होण्यापूर्वीच मोठा धमाका, विकली गेली 55,555 तिकिटे


पॅन इंडियाचा स्टार प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर ‘कल्की 2898 एडी’ रिलीज होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी आहे. या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. निर्मात्यांपासून ते या चित्रपटाच्या स्टारकास्टपर्यंत सर्वजण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काल, मुंबईत ‘कल्की 2898 एडी’ च्या प्री-रिलीझ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एकत्र दिसली. हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल, अशी या चित्रपटाकडून पूर्ण अपेक्षा आहे.

दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ने रिलीजपूर्वीच एक मोठा टप्पा गाठला आहे. हा चित्रपट देशातील तसेच परदेशातही लोकांना मोठ्या प्रमाणावर पाहता येईल, यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत. उत्तर अमेरिकेतून चित्रपटाच्या प्री-बुकिंगचे काही आकडे समोर आले आहेत. चित्रपटाची तिकीटे धडाधड विकली जात आहेत. उत्तर अमेरिकेत प्रभासच्या चित्रपटाचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे.

एका अहवालानुसार, रिलीज होण्यापूर्वीच ‘कल्की 2898 एडी’ची 55,555 तिकिटे विकली गेली आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर निर्माते खूप खूश आहेत. आता ‘कल्की 2898 एडी’चे यश परदेशातही पाहायला मिळेल, अशी त्याला पूर्ण आशा आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे हे आकडे आणखी वाढण्याची खात्री आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे.

नाग अश्विन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वैजयंती मुव्हीज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कमल हासन आणि दिशा पटनीसह अनेक कलाकार ‘कल्की 2898 एडी’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात बुज्जी नावाची व्यक्तिरेखा देखील दिसणार आहे, जी एक कार आहे आणि त्याचे संवाद कीर्ती सुरेशने स्वत:च्या आवाजात डब केले आहेत.