सोशल मीडियावर व्ह्युव्ज् मिळविण्यासाठी लावली आग आणि 1100 हेक्टर जंगल झाले राख


उत्तराखंडमध्ये लागलेली भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिहारमधील तरुण व्हिडिओ बनवण्यासाठी चमोलीच्या जंगलात आग लावत होते. तरुणाईचे सोशल मीडियाचे वेड इतके वाढले की त्यांनी उत्तराखंडच्या आधीच भडकलेल्या जंगलाला आग लावली.

तरुणांकडून आग लावण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते आगीशी खेळत असून ते बिहारी आहेत, बिहारींना कोणतेही चॅलेंज देता येणार नाही, असे आव्हानही देताना तरुण व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ तीन तरुणांना अटक केली. राज्यात आगीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तरुणांना अटक केली.

चमोलीच्या एसपीच्या म्हणण्यानुसार, तरुणांविरुद्ध भारतीय वन कायद्याच्या कलम 26 आणि आयपीसीच्या इतर कलमांनुसार जंगलात आग लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीप्रकरणी पोलिसांनी सलमान, ब्रिजेश कुमार आणि सुखलाल यांना बिहारमधून अटक केली आहे.

राज्याचे नियम न पाळणाऱ्या आणि त्यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चमोली पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

राज्यात आगीमुळे आतापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 365 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उत्तराखंडमधील गढवाल, कुमाऊं आणि चमोली भागात आगीच्या घटना घडत आहेत. सामान्य लोकांच्या मते, उन्हाळ्यात जंगलात विखुरलेली कोरडी पाने हे देखील आगीचे प्रमुख कारण आहे. या पानांमुळे, ज्वाला सहजपणे संपूर्ण जंगलात पसरतात.